Wednesday, 23 July 2014

● जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र ●

● जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र ●

आवश्यक कागदपत्रे
१) विहीत नमुन्यातील अर्ज
२) अर्जावर ₹ १०/- चे कोर्ट फी स्टॅम 
३) सोबत अर्जदार व वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला
४) वास्तव्याचा पुरावा
५) जातीचं मूळ प्रमाणपत्र व जातीच्या प्रमाणपत्रांची साक्षांकित प्रत
६) अर्जदाराचं प्रतिज्ञापत्र
७) मतदान ओळखपत्र/PAN कार्ड/वाहन चालवण्याचा परवाना 
भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार आणि संसदेने व राज्यशासनाने केलेल्या तरतुदीनुसार काही जाती व जमातींना शिक्षण व रोजगारांमध्ये राखीव जागा ठेवल्या जातात. त्याचा लाभ घेण्यासाठी जातीचं प्रमाणपत्र लागतं.बोगस प्रमाणपत्राचा धोका टाळण्यासाठी त्याची पडताळणी करुन घ्यावी लागते.त्यामुळे प्रवेशाच्या वेळी गर्दी करण्यापेक्षा वेळेवरच हे प्रमाणपत्र काढून घ्या.
शासनाने यासाठी राज्यात १५ जात पडताळणी केंद्र स्थापन केली आहेत.
जात पडताळणीसाठी उमेदवार गेल्यावर त्याची मुलाखत घेतली जाते.यावेळी कागदपत्रांच्या सत्यतेबाबत प्रश्न विचारले जातात.कागदपत्रांबाबत शंका आढळल्यास समिती सखोल चौकशी करते.या समितीकडे एक दक्षता पथक असतं.या पथकाद्वारे ही समिती चौकशी करते.त्यात अनेक प्रश्न विचारले जातात.यामध्ये परंपरा,कुलदैवत,रीतीरिवाज,सण,भाषा,वास्तव्याचं ठिकाण इ.बाबींचा समावेश असतो.
सर्व बाबींवर सखोल पडताळणी करुनच जात पडताळणी प्रमाणपत्र वाटप केले जाते.
प्रत्येकाने आपले मराठा मित्र,नातेवाईक,परीचित यांना ही माहिती फॉरवर्ड करा.
फेसबुक,व्हॉटस्अपवर सगळीकडे शेअर करा.
प्रसार करा.
अशा माहितीचे फलक सर्व तहसीलदार कचेरी,नागरी सुविधा केंद्र,सेतु,कॉलेज मधे लावा.
पॉम्प्लेट काढुन वाटा.
====================

● उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेबाबत दाखला - नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र ●

● उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेबाबत दाखला - नॉन क्रिमीलेयर                                  प्रमाणपत्र ●

सुचना - उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेबाबत उत्पन्नाची मर्यादा - ज्यांचे उत्पन्न मागील सलग 3 आर्थिक वर्षामध्ये प्रत्येक वर्षी रुपये 6 लाखापेक्षा कमी आहे,अशांनाच उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेबाबत दाखला मिळेल.
सदर उत्पन्नाची मर्यादा Government Resolution No. 3433/1/2013-Estt.(Res.), Government of India, Ministry of Personnel, Public Grievances & Pensions Department of Personnel & Training, dated 27th May, 2013 मधे नमुद आहे.

आवश्यक कागदपत्रे
१) विहीत नमुन्यातील अर्ज
२) अर्जावर ₹ १०/- चे कोर्ट फी स्टॅम्प
३) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र साक्षांकित
४) अर्जदाराचे मागील ३ वर्षाचे उत्पन्नाबाबतचे उल्लेख असलेले स्वयं प्रतिज्ञापत्र
५) उत्पन्नाबाबत मागील ३ वर्षाचे पुरावे
अ) अर्जदार शेतकरी/मजूर असल्यास तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला
ब) अर्जदार नोकरदार व व्यावसायिक असल्यास आयकर विवरणपत्र झेरॉक्स
क) जे नोकरदार व्यक्ती आयकर विवरण भरत नाहीत त्यांचे पगाराचे प्रमाणपत्र
ड) अर्जदार शिकत असल्यास बोनाफाईड प्रमाणपत्र
ई) नोकरी करत असल्यास फॉर्म १६ ची प्रत
फ) स्वंयरोजगार करत असल्यास व आयकर रिटर्न भरत नसल्यास स्थानिक नगरसेवकाकडून आपल्या नावे उत्पन्नाचा दाखला घ्यावा आणि अर्जावर तीन साक्षीदारांच्या सह्याव त्यांच्या रेशनकार्डची झेरॉक्स प्रत जोडावी
६) मतदान ओळखपत्र/PAN कार्ड/वाहन चालवण्याचा परवाना
वरील नमुद कागदपत्रे घेऊन आपल्या भागातील किंवा तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी असणाऱ्या नागरी सुविधा केंद्रात जावे.तिथुन विहीत नमुन्यातील अर्ज घेऊन त्यातील सर्व माहिती अचुक भरुन त्यावर सही करावी.त्या अर्जाला ₹१० चे कोर्ट फी फी स्टॅम्प लावावे.तसेच योग्य त्या किमतीच्या स्टॅम्पवर मागील तीन वर्षांच्या उत्पन्नाबाबत सज्ञान अर्जदाराचे स्वयं किंवा आई-वडिल किंवा कुटुंबातील सज्ञान व्यक्तीने स्वयं प्रतिज्ञापत्र करुन त्याची झेरॉक्स काढुन ते प्रतिज्ञापत्र आणि इतर सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडुन हा अर्ज नागरी सुविधा केंद्रात जमा करावा.
अर्जाची छाननी झाल्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमीलेयर दाखल्याचे वाटप केले जाईल.हा दाखला मिळाल्यानंतर त्यावर तहसीलदार/नायब तहसीलदार यांचा शिक्का व सही झाल्याची खात्री करुन घ्या
====================

● उत्पन्नाचा दाखला ●

● उत्पन्नाचा दाखला ●

आवश्यक कागदपत्रे
१) विहीत नमुन्यातील अर्ज
२) अर्जावर ₹ १०/- चे कोर्ट फी स्टॅम्प
३) उत्पन्नाबाबत साध्या कागदावरील प्रतिज्ञापत्र
अ) अर्जदार सज्ञान असल्यास स्वतःने केलेले प्रतिज्ञापत्र
ब) अर्जदार अज्ञान असल्यास त्याचे आई-वडिल किंवा कुटुंबातील सज्ञान व्यक्तीने केलेले प्रतिज्ञापत्र
४) उत्पन्नाबाबतचे पुरावे
अ) अर्जदार शेतकरी/मजूर असल्यास गाव कामगार तलाठ्यांचा एक व तीन वर्षांचा उत्पन्नाचा दाखला
ब) अर्जदार नोकरदार असल्यास पगाराचे प्रमाणपत्र/आयकर
क) अर्जदार व्यावसायिक असल्यास आयकर विवरण पत्र
ड) अर्जदाराला वैद्यकीय कारणासाठी प्रमाणपत्र हवे असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
ई) अर्जदार जर पेन्शनर असतील तर बँकेचे पासबुक/बँकेचे प्रमाणपत्र
५) शिधापत्रिकेची साक्षांकित प्रत (रेशनकार्ड)
६) अर्जदार शेतकरी असल्यास ८अ व चालू तारखेचे ७/१२ उतारे
७) रहिवास पुरावा म्हणून लाईट बिल अथवा मिळकत कर पावती
८) मतदान ओळखपत्र/PAN कार्ड/वाहन चालवण्याचा परवाना
वरील नमुद कागदपत्रे घेऊन आपल्या भागातील किंवा तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी असणाऱ्या नागरी सुविधा केंद्रात जावे.तिथुन विहीत नमुन्यातील अर्ज घेऊन त्यातील सर्व माहिती अचुक भरुन त्यावर सही करावी.त्या अर्जाला ₹१० चे कोर्ट फी फी स्टॅम्प लावावे.तसेच योग्य त्या किमतीच्या स्टॅम्पवर उत्पन्नाबाबत सज्ञान अर्जदाराचे स्वयं किंवा आई-वडिल किंवा कुटुंबातील सज्ञान व्यक्तीने स्वयं प्रतिज्ञापत्र करुन त्याची झेरॉक्स काढुन ते प्रतिज्ञापत्र आणि इतर सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडुन हा अर्ज नागरी सुविधा केंद्रात जमा करावा.अर्ज करताना तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला मिळावा हे नमुद करावे.
अर्जाची छाननी झाल्यानंतर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याचे वाटप केले जाईल.हा दाखला मिळाल्यानंतर त्यावर तहसीलदार/नायब तहसीलदार यांचा शिक्का व सही झाल्याची खात्री करुन घ्यावी.

====================
● जातीचा दाखला ●
आवश्यक कागदपत्रे
१) विहीत नमुन्यातील अर्ज
२) अर्जावर ₹ १०/- चे कोर्ट फी स्टॅम्प
३) जातीबाबत स्वयं प्रतिज्ञापत्र (शैक्षणिक प्रयोजनासाठी साध्या कागदावर)
४) ज्याला दाखला आवश्यक आहे त्यांचा जात नमुद असलेला शाळा सोडल्याचा दाखला व किंवा शाळेत शिकत असल्यास शाळेचे जातीबाबतचे प्रमाणपत्र बोनाफाईड (मूळ प्रतीसह)
५) शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग (ESBC) यांचे बाबतीत दिनांक १३/१०/१९६७ रोजी किंवा त्यापुर्वी जन्म झालेल्या अर्जदार किंवा अर्जदाराचे वडील,भाऊ,बहीण,आजोबा,चुलते,आत्या किंवा इतर रक्त नाते संबंधातील व्यक्तीची "मराठा" अशी जात नमुद असलेला खालीलपैकी एक पुरावा (मूळ प्रतीसह)
अ) शाळा सोडल्याचा दाखला
ब) जन्म-मृत्यू नोंदीचा महसुल अभिलेखातील उतारा
क) शासकीय-निमशासकीय नोकरीत असल्यास सेवापुस्तकाच्या पहिल्या पृष्ठाचा संबंधित कार्यालयाने जातीची नोंद साक्षांकित केलेला उतारा
ड) समाज कल्याण खात्याकडील जात पडताळणी समितीने वैध ठरविलेले जातीबाबत प्रमाणपत्र
६) वडीलाचा जातीचा पुरावा उपलब्ध नसल्यामुळे इतर रक्तनाते संबंधितांचे पुरावे दिल्यास नाते स्पष्ट होण्यासाठी वंशावळ असलेले स्वयं प्रतिज्ञापत्र व नाते स्पष्ट होणारे कागदोपत्री पुरावे (₹ २०/- चे स्टॅम्प पेपरवर)े
७) महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक ०१ सप्टेंबर २०१२ च्या अधिसूचनेतील मुद्दा क्रमांक ३ अन्वये अर्जदार इतर तालुक्यातुन/पर जिल्हातुन/परराज्यातुन स्थलांतरित किंवा महाराष्ट्र राज्यांतर्गत स्थलांतरित झाला असल्यास,अर्जदार ज्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये त्याचे वाडवडिल किंवा नातेवाईक राहत होते,त्यासंबंधीत सक्षम प्राधिकाऱ्याकडे जातीच्या प्रमाणपत्राकरिता अर्ज करील.
८) रहिवासाचा पुरावा म्हणुन शिधापत्रीकेची प्रमाणित प्रत / लाईट बिल अथवा मिळकत कर पावती
९) विवाहीत स्त्रियांसाठी प्रमाणपत्र हवे असल्यास
अ) विवाहापुर्वीची जात सिध्द करणारा वरील अ.क्र.५ मध्ये दिल्याप्रमाणे कोणताही एक पुरावा
ब) विवाहाचा पुरावा म्हणून विवाह नोंदणी दाखला,राजपत्रात (Gazzette) प्रसिध्द झालेला नावातील बदल व लग्नपत्रिका किंवा पोलीस पाटील यांचा दाखला
१०) मतदान ओळखपत्र/PAN कार्ड/वाहन चालवण्याचा परवाना
११) मराठा आरक्षणाबाबत काढलेला शासनादेश
वरील नमुद कागदपत्रे घेऊन आपल्या भागातील किंवा तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी असणाऱ्या नागरी सुविधा केंद्रात जावे.तिथुन विहीत नमुन्यातील अर्ज घेऊन त्यातील सर्व माहिती अचुक भरुन त्यावर सही करावी.त्या अर्जाला ₹१० चे कोर्ट फी फी स्टॅम्प लावावे.तसेच योग्य त्या किमतीच्या स्टॅम्पवर जातीबाबत सज्ञान अर्जदाराचे स्वयं किंवा वडिल किंवा आई यांचे प्रतिज्ञापत्र करुन त्याची झेरॉक्स काढुन ते प्रतिज्ञापत्र आणि इतर सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडुन हा अर्ज नागरी सुविधा केंद्रात जमा करावा.
अर्जाची छाननी झाल्यानंतर तुम्हाला जातीच्या दाखल्याचे वाटप केले जाईल.हा दाखला मिळाल्यानंतर त्यावर तहसीलदार/नायब तहसीलदार यांचा शिक्का व सही झाल्याची खात्री करुन घ्या
====================

● वय,अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र ●

● वय,अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र ●

आवश्यक कागदपत्रे
१) विहीत नमुन्यातील अर्ज
२) अर्जावर ₹१०/- चे कोर्ट फी स्टॅम्प
३) इयत्ता १० वी चे बोर्ड सर्टिफिकेट
४) गावात सलग १५ वर्षे राहत असल्याबाबत ग्रामसेवक अथवा तलाठी यांचा दाखला
किंवा १५ वर्षे महाराष्ट्रातील रहिवास सिद्ध करणारे इतर पुरावे -
उदा.मालमत्ता कर पावत्या/वीज देयके (लाईट बिल)/७/१२ उतारा/मनपाकडील फोटोपास/भाडे पावत्या,भाडे करार (अर्जदार भाडयाने राहत असल्यास घरमालकाचे रु.१००/- चे स्टॅम्प पेपरवर नागरी सुविधा केंद्र येथे केलेले संमतीपत्र सादर करावे व घरमालकाचे नावे असलेली विज देयके सादर करावीत.(यापैकी सन १९८७ पासून २००३ पर्यंत प्रत्येक वर्षाचा एक एक पुरावा सादर करावा.)
५) रहिवासाचा पुरावा म्हणून शिधापत्रिकेची साक्षांकित प्रत
६) महाराष्ट्रात सलग १५ वर्षे वास्तव्य असल्याबाबतचे पालकांचे स्वयं प्रतिज्ञापत्र किंवा सज्ञान अर्जदाराच्या बाबतीत अर्जदाराचे स्वयं प्रतिज्ञापत्र
७) अर्जदार व अर्जदारांचे वडील यांचा शाळा सोडल्याचा दाखला (ज्यामध्ये जन्मस्थळाचे ठिकाण व जन्मतारीख याचा उल्लेख आवश्यक)
किंवा
ग्रामपंचायत अथवा नगरपालिका अथवा महानगरपालिका यांच्याकडील जन्मनोंद वहीचा उतारा किंवा सेवानोंद पुस्तकातील जन्मनोंद असलेल्याची प्रतटिप-
अ) मुळचे महाराष्ट्रीयन इतर राज्यांमध्ये तात्पुरत्या कारणासाठी गेले असतील,तर त्यांच्या स्थावर मिळकतीचे पुरावे सादर करावेत
ब) मुळचे भारतीय परदेशामध्ये तात्पुरत्या कारणासाठी गेले असतील तर पासपोर्टची सत्य प्रत व स्थावर मिळकतीचे पुरावे सादर करावेत
टिपमधील अ) आणि ब) चा उल्लेख प्रतिज्ञापत्रात करणे आवश्यक आहे.
क) जर अर्जदार हे परराज्यातील असतील तर वीस वर्षापासुनचे महाराष्ट्रातील वास्तव्याबाबत महसुली पुरावा (मालमत्तेचे कार्ड,जमीन असेल तर ७/१२,खरेदी खत,कर पावत्या) सादर करणे आवश्यक
८) विवाहीत स्त्रियांसाठी प्रमाणपत्र हवे असल्यास
अ) विवाहानंतरचे पुरावे म्हणुन पतीचा शाळा सोडल्याचा दाखला व पतीकडील रहिवासाचे पुरावे
ब) विवाहाचा पुरावा म्हणून विवाह नोंदणी दाखला किंवा राजपत्रात (Gazzette) प्रसिध्द झालेला नावातील बदल किंवा लग्नपत्रिका किंवा पोलीस पाटील यांचा दाखला
९) मतदान ओळखपत्र/PAN कार्ड/वाहन चालवण्याचा परवाना
वरील नमुद कागदपत्रे घेऊन आपल्या भागातील किंवा तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी असणाऱ्या नागरी सुविधा केंद्रात जावे.तिथुन विहीत नमुन्यातील अर्ज घेऊन त्यातील सर्व माहिती अचुक भरुन त्यावर सही करावी.त्या अर्जाला ₹१० चे कोर्ट फी फी स्टॅम्प लावावे.तसेच योग्य त्या किमतीच्या स्टॅम्पवर महाराष्ट्रात सलग १५ वर्षे वास्तव्य असल्याबाबतचे पालकांचे स्वयं प्रतिज्ञापत्र किंवा सज्ञान अर्जदाराच्या बाबतीत अर्जदाराचे स्वयं प्रतिज्ञापत्र करुन त्याची झेरॉक्स काढुन ते प्रतिज्ञापत्र आणि इतर सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडुन हा अर्ज नागरी सुविधा केंद्रात जमा करावा.
अर्जाची छाननी झाल्यानंतर तुम्हाला वय,अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र वाटप केले जाईल.हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्यावर तहसीलदार/नायब तहसीलदार यांचा शिक्का व सही झाल्याची खात्री करुन घ्यावी.
====================

Tuesday, 22 July 2014

मराठा आरक्षण आणि आवश्यक कागदपत्रे..

मराठा आरक्षण आणि आवश्यक कागदपत्रे

|| मराठा आरक्षण जनजागृती अभियान ||
●● मराठा आरक्षण आणि आवश्यक कागदपत्रे यांची जमवाजमव ●●

http://marathaaarakshann.blogspot.in
====================
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी
शासन निर्णय क्रमांक : सीबीसी-१०/२०१३/प्र.क्र.३५/मावक अन्वये
"शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (शै.सा.मा.प्र.)
Educationally and Socially Backward Category (ESBC)"
या नावाचा नवीन प्रवर्ग तयार केला आहे.
या शासन निर्णयानुसार मराठा या जातीचा सदर प्रवर्गात समावेश केला असुन शासकीय/निमशासकीय सेवा (सरळसेवा भरतीसाठी) आणि शैक्षणिक संस्थांमध्ये या प्रवर्गास १६% आरक्षण देण्याचा आदेश दिनांक १५ जुलै २०१४ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सचिवांच्या डिजीटल सहीने काढण्यात आला आहे आणि या आदेशाच्या प्रती सर्व शासकीय / निमशासकीय विभागांना पाठविण्यात आल्या आहेत.
सर्व शासकीय व खाजगी अनुदानित व विना अनुदानित शालेय शिक्षण,उच्च व तंत्रशिक्षण,वैद्यकीय शिक्षण,औषधी द्रव्ये शिक्षण,कृषी शिक्षण,पदुम शिक्षण या विभागा अंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्था,विद्यापीठ यांमधील प्रवेशासाठी सदर आरक्षण लागू असणार आहे.
====================
● मराठा आरक्षणाचा प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ●
१) जातीचा दाखला ( Cast Certificate ) - तहसीलदार
२) उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचा दाखला ( Non Creamy Layer Certificate ) - तहसीलदार
३) जात वैधता प्रमाणपत्र ( Cast Validity Certificate ) - जिल्हा समाज कल्याण अधिकारी
४) उत्पन्नाचा दाखला - तहसीलदार
५) वय,अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र ( Age,Domicile % Nationality Certificate ) - तहसीलदार
====================
वरील दाखले कसे,कुठे काढावे लागतात,त्यासाठी कोणती कागदपत्र लागतात,त्याची प्रक्रिया कशी असते याबाबत लोकांना जास्त माहीती उपलब्ध होत नाही.त्यामुळे संभाजी ब्रिगेड बारामती-इंदापुर यांनी या सर्व प्रक्रियेबाबत माहिती गोळा करुन ती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे..
====================
मराठा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी मराठा समाजातील पात्र घटकांनी पुढील क्रम लक्षात घेऊन कागदपत्रांची जमवाजमव करावी आणि दिलेल्या क्रमानेच एक एक कागदपत्र/दाखला/प्रमाणपत्र संबंधित विभागामधुन काढावे.
१) वय,अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
२) उत्पन्नाचा दाखला
३) जातीचा दाखला
४) नॉन क्रिमीलेयर दाखला
५) जात वैधता प्रमाणपत्र
====================
ज्या व्यक्तीला मराठा आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्या व्यक्तीने आपले वरील दाखले/प्रमाणपत्रे काढण्यासाठी खालील यादीत दिलेल्या स्वतःच्या सर्व कागदपत्रांची चांगली अशी फाईल तयार करावी.
सदर फाईल संपुर्ण शैक्षणिक कालखंड व नोकरीसाठी सुध्दा उपयोगी असते,याशिवाय तिचा उपयोग इतर ठिकाणीही होत असतो.
खाली दिलेली सर्व कागदपत्रे विशेष कार्यकारी अधिकारी/राजपत्रित अधिकारी/शाळा,हायस्कुलचे मुख्याध्यापक/कॉलेजचे प्राचार्य यांपैकी कोणाकडुन तरी प्रमाणित ( Attested - True Copy ) केलेली असावीत.
खाली दिलेल्या कागदपत्रांच्या प्रत्येकी १० प्रमाणित केलेल्या झेरॉक्स प्रती आपल्या फाईल मधे असाव्यात..
कागदपत्रे -
१) इयत्ता १०वी आणि १२वी चे गुणपत्रक,बोर्ड सर्टिफिकेट,शाळा सोडल्याचा दाखला.
२) आपल्या जन्माचा दाखला
३) आपले नाव असणाऱ्या शिधापत्रीकेचे पहिले व शेवटचे पान
४) वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला
५) गावातील १५ वर्ष व त्यापेक्षा जास्त वास्तव्य असण्याचा ग्रामसेवक व गावकामगार तलाठी यांचा रहीवासी दाखला ( किंवा मागील १५ वर्षाचे वास्तव्य सिध्द करणारी विजबीले,७/१२ उतारे,मालमत्ता कर पावत्या,इत्यादि )
६) गावकामगार तलाठी यांच्याकडुन कुटुंबप्रमुख/शिधापत्रीका प्रमुखाच्या ( जर अर्जदार सज्ञान असेल तर अर्जदाराच्या ) नावे मागील एक आणि तीन वर्षांचा उत्पन्नाचा दाखला
७) मतदान ओळखपत्र/PAN कार्ड/वाहन चालवण्याचा परवाना
====================

वंशावळीचे उदाहरण

वंशावळीचे उदाहरण

|| मराठा आरक्षण हेल्पलाईन ||
=========================
वंशावळ कशी लिहावी ?
मराठा जातीचा दाखला काढण्यासाठी १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्यापुर्वी जन्म झालेल्या तुमच्या रक्त नाते संबंधातील व्यक्तीशी तुमचे नाते दर्शवण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या वंशावळीचे उदाहरण..
                        

                                       आजोबा
                                              |
                               _________________
              |             |              |
           वडील       चुलते        आत्या

                          |
                  ___________
              |         |        |
             तुम्ही    भाऊ   बहीण




साभार - http://marathaaarakshann.blogspot.in

एकमेकांना जातीचे दाखले काढण्यासाठी मदत करा.
शेअर करा.

=========================

शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग....

असे काढा जातीचे आणि नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र

|| मराठा आरक्षण हेल्पलाईन ||
कसा काढणार जातीचा दाखला आणि नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र ?
(साध्या,सरळ शब्दात...)
©लेखन - अनिल माने.
मराठा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम जातीचा दाखला आणि नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र काढावे लागेल.त्यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करा.
====================
STEP -1) जातीचा पुरावा काढणे
१) सर्वप्रथम तुमच्या नावापुढे "मराठा" असा उल्लेख असणारा इयत्ता पहीली ते इयत्ता बारावी पर्यंतच्या कोणत्याही एका वर्गातील तुमचा शाळा सोडल्याचा दाखला काढा.(ओरीजनल किंवा डुप्लीकेट)
जर तुम्हाला असा दाखला मिळाला नाही तर तुम्ही ज्या महाविद्यालयात शिकत असाल तिथुन बोनाफाइड सर्टिफिकेट काढा.परंतु बोनाफाइडवर तुमच्या जन्मतारीख व जातीचा उल्लेख असायला हवा,याची काळजी घ्या.
२) तुमच्या वडिलांचा १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्यापुर्वी जन्म झाला असेल तर त्यांच्या दाखल्यावर "मराठा" अशी जात नमुद असलेला खालीलपैकी कोणत्याही एका पुराव्याची एक मुळ प्रत काढा
अ) पहीली ते बारावी पर्यंतचा शाळा सोडल्याचा दाखला (ओरीजनल किंवा डुप्लीकेट)
ब) जन्म-मृत्यू नोंदीचा महसुल अभिलेखातील उतारा
क) शासकीय-निमशासकीय नोकरीत असल्यास सेवापुस्तकाच्या पहिल्या पृष्ठाचा संबंधित कार्यालयाने जातीची नोंद साक्षांकित केलेला उतारा
ड) समाज कल्याण खात्याकडील जात पडताळणी समितीने वैध ठरविलेले जातीबाबत प्रमाणपत्र.
३) काही कारणाने वडिलांचा जातीचा दाखला उपलब्ध होत नसेल तर तुमच्या घरातील १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्यापुर्वी जन्म झालेल्या तुमचे भाऊ,बहीण,चुलते,आत्या,आजोबा किंवा इतर रक्त नाते संबंधातील व्यक्ती यापैकी कोणीही असेल आणि त्याच्या दाखल्यावर "मराठा" अशी जात नमुद असेल तर त्या व्यक्तीच्या खालीलपैकी कोणत्याही एका पुराव्याची एक मुळ प्रत काढा
अ) पहीली ते बारावी पर्यंतचा शाळा सोडल्याचा दाखला (ओरीजनल किंवा डुप्लीकेट)
ब) जन्म-मृत्यु नोंदीचा महसुल अभिलेखातील उतारा
क) शासकीय-निमशासकीय नोकरीत असल्यास सेवापुस्तकाच्या पहिल्या पानाचा संबंधित कार्यालयाने जातीची नोंद साक्षांकित केलेला उतारा
ड) समाज कल्याण खात्याकडील जात पडताळणी समितीने वैध ठरविलेले जातीबाबत प्रमाणपत्र
४) अशा प्रकारे "मराठा" असा जातीचा स्पष्ट उल्लेख असणारे वरील दाखले घ्या आणि त्यांच्या प्रत्येकी पाच सत्यप्रत (True Copy) तयार करा.
====================
******** सुचना ********
सुचना क्रं. १ - जर १३ ऑक्टोबर १९६७ पुर्वी जन्म झालेल्या तुमच्या वडिल किंवा आजोबांचा जातीचा पुरावा उपलब्ध असेल तर आजोबा-वडिल-तुम्ही अशी तुमचे नाते दर्शवणारी वंशावळ स्टँप पेपरवर लिहुन द्यावी.
सुचना क्रं. २ - वडीलांचा जातीचा पुरावा उपलब्ध नसल्यामुळे इतर रक्त नाते संबंधितांचे पुरावे द्यावे लागत असल्यास तुमचे आणि त्या संबंधित व्यक्तीचे नाते स्पष्ट होण्यासाठी संबंधित व्यक्तीचे आणि तुमचे नाते दर्शवणारी वंशावळ स्टँप पेपरवर लिहुन द्यावी आणि त्याबद्दल काही कागदोपत्री पुरावे असल्यास ते ही द्यावेत.
====================
STEP -2) उत्पन्नाचा आणि रहीवासी दाखला घेणे.
१) आपले रेशनकार्ड घेऊन आपल्या भागातील तलाठी कार्यालयात जा.आपले रेशनकार्ड दाखवुन तलाठ्याकडुन तुमच्या नावाचा (शैक्षणिक कामासाठी असा उल्लेख करुन) मागील एका वर्षाचा आणि मागील तीन वर्षाचा असे उत्पन्नाचे दोन दाखले घ्या.
२) तसेच तलाठ्याकडुन तुमच्या नावाचे दोन रहीवासी दाखले घ्या.
३) वरील प्रमाणे दाखले काढुन घ्या आणि वरील सर्वांच्या प्रत्येकी दोन सत्यप्रत (True Copy) तयार करा.
====================
STEP -3) तहसीलदार कार्यालयातुन जातीचा दाखला काढणे.
१) वर STEP -1 आणि STEP -2 मधे सांगितलेली सर्व कागदपत्रे घेऊन तहसीलदार कार्यालयात जा.
२) ही कागदपत्रे पुढील यादी प्रमाणे एकत्र जोडावीत -
● रेशनकार्डची सत्यप्रत
● रहिवासी दाखला
● जातीच्या पुराव्याच्या सर्व दाखल्यांच्या सत्यप्रती
● १००रु. च्या स्टँप पेपरवर जातीबाबत तुमचे स्वतःचे सत्य प्रतिज्ञापत्र लिहुन द्यावे.त्याच स्टँप पेपरवर वरील सुचना क्रं.१ किंवा सुचना क्रं.२ यापैकी एक लागु होणारी वंशावळ नमुद करावी.तुमचा फोटो लावावा.सही करावी.
३) महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक ०१ सप्टेंबर २०१२ च्या अधिसूचनेतील मुद्दा क्रमांक ३ अन्वये अर्जदार इतर तालुक्यातुन/पर जिल्हातुन/परराज्यातुन स्थलांतरित किंवा महाराष्ट्र राज्यांतर्गत स्थलांतरित झाला असल्यास,अर्जदार ज्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये त्याचे वाडवडिल किंवा नातेवाईक राहत होते,त्या संबंधीत सक्षम प्राधिकाऱ्याकडे जातीच्या प्रमाणपत्राकरिता अर्ज करील.
४) विवाहीत स्त्रियांसाठी प्रमाणपत्र हवे असल्यास पुढील पुरावे जोडावे
अ) विवाहापुर्वीची जात सिध्द करणारा वरील STEP-1 च्या २ व ३ मध्ये दिल्याप्रमाणे कोणताही एक पुरावा
ब) विवाहाचा पुरावा म्हणून विवाह नोंदणी दाखला,राजपत्रात (Gazzette) प्रसिध्द झालेला नावातील बदल व लग्नपत्रिका किंवा पोलीस पाटील यांचा दाखला

५) सेतुमधुन जातीचा दाखला काढण्यासाठी आवश्यक असणारा फॉर्म घ्यावा.त्यातील सर्व माहिती अचुकपणे भरुन तुमची सही करावी.त्यावर १०रु चे एक किंवा ५रु चे दोन कोर्ट फी स्टँप लावावे.या फॉर्मसोबत वर यादीत दिलेली सर्व कागदपत्रे जोडावीत.हा पुर्ण भरलेला व आवश्यक कागदपत्रे जोडलेला फॉर्म सेतु मधे जमा करावा.फॉर्म जमा केल्याची पोचपावती/टोकन घ्यावे.सदर टोकन वर तुमचा जातीचा दाखला मिळण्याची तारीख दिली जाते.हे टोकन जपुन ठेवावे आणि त्यावर दिलेल्या तारखेला येऊन टोकन दाखवुन आपला जातीचा दाखला घ्यावा.त्यावर तहसीलदाराची सही-शिक्का असल्याची खात्री करावी.
जातीचा दाखला मिळाल्यावर त्याच्या दहा सत्यप्रत (True Copy) तयार करा.
े====================
सुचना क्रं.३ - जातीचा दाखला मिळेपर्यंत शालेय कामांसाठी हे टोकन दाखवले तरी चालते.
====================
STEP -4) तहसीलदार कार्यालयातुन उत्पन्नाचा दाखला काढणे.
१) उत्पन्नाबाबतचे पुरावे काढा.
अ) अर्जदार शेतकरी/मजूर असल्यास आपले रेशनकार्ड दाखवुन गाव कामगार तलाठ्याकडुन मागील एक व तीन वर्षांचा उत्पन्नाचा दाखला घ्या.
ब) अर्जदार नोकरदार असल्यास पगाराचे प्रमाणपत्र/आयकर घ्या.
क) अर्जदार व्यावसायिक असल्यास आयकर विवरण पत्र घ्या.
ड) अर्जदाराला वैद्यकीय कारणासाठी प्रमाणपत्र हवे असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र घ्या.
ई) अर्जदार जर पेन्शनर असतील तर बँकेचे पासबुक/बँकेचे प्रमाणपत्र घ्या.
२) हे दाखले व आपले रेशनकार्ड घेऊन तहसीलदार कार्यालयात जा.
३) पुढीलप्रमाणे कागदपत्रांची यादी एकत्र करा.
● रेशनकार्डची सत्यप्रत
● रहिवासी दाखला
● उत्पन्नाबाबतचे पुरावे
● उत्पन्नाबाबत स्टँप पेपरवर सत्य प्रतिज्ञापत्र
अ) अर्जदार सज्ञान असल्यास स्वतःने केलेले प्रतिज्ञापत्र
ब) अर्जदार अज्ञान असल्यास त्याचे आई-वडिल किंवा कुटुंबातील सज्ञान व्यक्तीने केलेले प्रतिज्ञापत्र
४) सेतुमधुन उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आवश्यक असणारा फॉर्म घ्यावा.त्यातील सर्व माहिती अचुकपणे भरुन तुमची सही करावी.त्यावर १०रु चे एक किंवा ५रु चे दोन कोर्ट फी स्टँप लावावे.या फॉर्मसोबत वर यादीत दिलेली सर्व कागदपत्रे जोडावीत.हा पुर्ण भरलेला व आवश्यक कागदपत्रे जोडलेला फॉर्म सेतु मधे जमा करावा.फॉर्म जमा केल्याची पोचपावती/टोकन घ्यावे.सदर टोकन वर तुमचा उत्पन्नाचा दाखला मिळण्याची तारीख दिली जाते.हे टोकन जपुन ठेवावे आणि टोकनवर दिलेल्या दिवशी येऊन टोकन दाखवुन आपला उत्पन्नाचा दाखला घ्यावा.त्यावर तहसीलदाराची सही-शिक्का असल्याची खात्री करावी.
उत्पन्नाचा दाखला मिळाल्यावर त्याच्या दहा सत्यप्रत (True Copy) तयार करा.

====================
STEP -5) तहसीलदार कार्यालयातुन उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेबाबतचे (नॉन क्रिमीलेयर) प्रमाणपत्र काढणे.
१) वरील STEP-3 आणि STEP-4 मधे सांगितल्याप्रमाणे तहसीलदारने दिलेला तुमचा जातीचा आणि उत्पन्नाचा दाखला घेऊन तहसीलदार कार्यालयात जा.

२) पुढीलप्रमाणे कागदपत्रांची यादी एकत्र करा
● रेशनकार्डची सत्यप्रत
● तहसीलदारने दिलेल्या जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
● तहसीलदारने दिलेल्या उत्पन्नाच्या दाखल्याची सत्यप्रत
● उत्पन्नाबाबत स्टँप पेपरवर सत्य प्रतिज्ञापत्र
अ) अर्जदार सज्ञान असल्यास स्वतःने केलेले प्रतिज्ञापत्र
ब) अर्जदार अज्ञान असल्यास त्याचे आई-वडिल किंवा कुटुंबातील सज्ञान
३) सेतुमधुन नॉन-क्रिमीलेयर दाखला काढण्यासाठी आवश्यक असणारा फॉर्म घ्यावा.त्यातील सर्व माहिती अचुकपणे भरुन तुमची सही करावी.त्यावर १०रु चे एक किंवा ५रु चे दोन कोर्ट फी स्टँप लावावे.या फॉर्मसोबत वर यादीत दिलेली सर्व कागदपत्रे जोडावीत.हा पुर्ण भरलेला व आवश्यक कागदपत्रे जोडलेला फॉर्म सेतु मधे जमा करावा.फॉर्म जमा केल्याची पोचपावती/टोकन घ्यावे.सदर टोकन वर तुमचे नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र मिळण्याची तारीख दिली जाते.हे टोकन जपुन ठेवावे आणि टोकनवर दिलेल्या दिवशी येऊन टोकन दाखवुन आपले नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र घ्यावे.त्यावर तहसीलदाराची सही-शिक्का असल्याची खात्री करावी.
नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र मिळाल्यावर त्याच्या दहा सत्यप्रत (True Copy) तयार करा.
====================
सुचना क्रं.४ - ज्यांचे उत्पन्न मागील सलग 3 आर्थिक वर्षामध्ये प्रत्येक वर्षी रुपये 6 लाखांपेक्षा कमी आहे,अशांनाच उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेबाबत (नॉन-क्रिमीलेयर) प्रमाणपत्र मिळेल.
सदर उत्पन्नाची मर्यादा Government Resolution No. 3433/1/2013-Estt.(Res.), Government of India, Ministry of Personnel, Public Grievances & Pensions Department of Personnel & Training, dated 27th May, 2013 अनुसार आहे.
====================
तहसीलदार कार्यालयात सारखे हेलपाटे मारावे लागु नयेत यासाठी पुढील प्रमाणे कृती करा.
● उत्पन्नाच्या आणि जातीच्या दाखल्यासाठी एकाच दिवशी फॉर्म भरा.
● जातीचा दाखला आणायला गेलेल्या दिवशीच नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र काढण्यासाठी फॉर्म भरा.
====================
प्रत्येकाने ही माहीती शेअर करा.
जमले तर पाम्पलेट काढुन वाटा.
जातीचे दाखले व नॉन-क्रिमीलेयर दाखले काढण्यासाठी शिबीर भरवा.
====================
सौजन्य - संभाजी ब्रिगेड बारामती-इंदापुर
====================
|| || || || जयोस्तु मराठा || || || ||