Wednesday, 23 July 2014

● उत्पन्नाचा दाखला ●

● उत्पन्नाचा दाखला ●

आवश्यक कागदपत्रे
१) विहीत नमुन्यातील अर्ज
२) अर्जावर ₹ १०/- चे कोर्ट फी स्टॅम्प
३) उत्पन्नाबाबत साध्या कागदावरील प्रतिज्ञापत्र
अ) अर्जदार सज्ञान असल्यास स्वतःने केलेले प्रतिज्ञापत्र
ब) अर्जदार अज्ञान असल्यास त्याचे आई-वडिल किंवा कुटुंबातील सज्ञान व्यक्तीने केलेले प्रतिज्ञापत्र
४) उत्पन्नाबाबतचे पुरावे
अ) अर्जदार शेतकरी/मजूर असल्यास गाव कामगार तलाठ्यांचा एक व तीन वर्षांचा उत्पन्नाचा दाखला
ब) अर्जदार नोकरदार असल्यास पगाराचे प्रमाणपत्र/आयकर
क) अर्जदार व्यावसायिक असल्यास आयकर विवरण पत्र
ड) अर्जदाराला वैद्यकीय कारणासाठी प्रमाणपत्र हवे असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
ई) अर्जदार जर पेन्शनर असतील तर बँकेचे पासबुक/बँकेचे प्रमाणपत्र
५) शिधापत्रिकेची साक्षांकित प्रत (रेशनकार्ड)
६) अर्जदार शेतकरी असल्यास ८अ व चालू तारखेचे ७/१२ उतारे
७) रहिवास पुरावा म्हणून लाईट बिल अथवा मिळकत कर पावती
८) मतदान ओळखपत्र/PAN कार्ड/वाहन चालवण्याचा परवाना
वरील नमुद कागदपत्रे घेऊन आपल्या भागातील किंवा तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी असणाऱ्या नागरी सुविधा केंद्रात जावे.तिथुन विहीत नमुन्यातील अर्ज घेऊन त्यातील सर्व माहिती अचुक भरुन त्यावर सही करावी.त्या अर्जाला ₹१० चे कोर्ट फी फी स्टॅम्प लावावे.तसेच योग्य त्या किमतीच्या स्टॅम्पवर उत्पन्नाबाबत सज्ञान अर्जदाराचे स्वयं किंवा आई-वडिल किंवा कुटुंबातील सज्ञान व्यक्तीने स्वयं प्रतिज्ञापत्र करुन त्याची झेरॉक्स काढुन ते प्रतिज्ञापत्र आणि इतर सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडुन हा अर्ज नागरी सुविधा केंद्रात जमा करावा.अर्ज करताना तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला मिळावा हे नमुद करावे.
अर्जाची छाननी झाल्यानंतर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याचे वाटप केले जाईल.हा दाखला मिळाल्यानंतर त्यावर तहसीलदार/नायब तहसीलदार यांचा शिक्का व सही झाल्याची खात्री करुन घ्यावी.

====================
● जातीचा दाखला ●
आवश्यक कागदपत्रे
१) विहीत नमुन्यातील अर्ज
२) अर्जावर ₹ १०/- चे कोर्ट फी स्टॅम्प
३) जातीबाबत स्वयं प्रतिज्ञापत्र (शैक्षणिक प्रयोजनासाठी साध्या कागदावर)
४) ज्याला दाखला आवश्यक आहे त्यांचा जात नमुद असलेला शाळा सोडल्याचा दाखला व किंवा शाळेत शिकत असल्यास शाळेचे जातीबाबतचे प्रमाणपत्र बोनाफाईड (मूळ प्रतीसह)
५) शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग (ESBC) यांचे बाबतीत दिनांक १३/१०/१९६७ रोजी किंवा त्यापुर्वी जन्म झालेल्या अर्जदार किंवा अर्जदाराचे वडील,भाऊ,बहीण,आजोबा,चुलते,आत्या किंवा इतर रक्त नाते संबंधातील व्यक्तीची "मराठा" अशी जात नमुद असलेला खालीलपैकी एक पुरावा (मूळ प्रतीसह)
अ) शाळा सोडल्याचा दाखला
ब) जन्म-मृत्यू नोंदीचा महसुल अभिलेखातील उतारा
क) शासकीय-निमशासकीय नोकरीत असल्यास सेवापुस्तकाच्या पहिल्या पृष्ठाचा संबंधित कार्यालयाने जातीची नोंद साक्षांकित केलेला उतारा
ड) समाज कल्याण खात्याकडील जात पडताळणी समितीने वैध ठरविलेले जातीबाबत प्रमाणपत्र
६) वडीलाचा जातीचा पुरावा उपलब्ध नसल्यामुळे इतर रक्तनाते संबंधितांचे पुरावे दिल्यास नाते स्पष्ट होण्यासाठी वंशावळ असलेले स्वयं प्रतिज्ञापत्र व नाते स्पष्ट होणारे कागदोपत्री पुरावे (₹ २०/- चे स्टॅम्प पेपरवर)े
७) महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक ०१ सप्टेंबर २०१२ च्या अधिसूचनेतील मुद्दा क्रमांक ३ अन्वये अर्जदार इतर तालुक्यातुन/पर जिल्हातुन/परराज्यातुन स्थलांतरित किंवा महाराष्ट्र राज्यांतर्गत स्थलांतरित झाला असल्यास,अर्जदार ज्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये त्याचे वाडवडिल किंवा नातेवाईक राहत होते,त्यासंबंधीत सक्षम प्राधिकाऱ्याकडे जातीच्या प्रमाणपत्राकरिता अर्ज करील.
८) रहिवासाचा पुरावा म्हणुन शिधापत्रीकेची प्रमाणित प्रत / लाईट बिल अथवा मिळकत कर पावती
९) विवाहीत स्त्रियांसाठी प्रमाणपत्र हवे असल्यास
अ) विवाहापुर्वीची जात सिध्द करणारा वरील अ.क्र.५ मध्ये दिल्याप्रमाणे कोणताही एक पुरावा
ब) विवाहाचा पुरावा म्हणून विवाह नोंदणी दाखला,राजपत्रात (Gazzette) प्रसिध्द झालेला नावातील बदल व लग्नपत्रिका किंवा पोलीस पाटील यांचा दाखला
१०) मतदान ओळखपत्र/PAN कार्ड/वाहन चालवण्याचा परवाना
११) मराठा आरक्षणाबाबत काढलेला शासनादेश
वरील नमुद कागदपत्रे घेऊन आपल्या भागातील किंवा तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी असणाऱ्या नागरी सुविधा केंद्रात जावे.तिथुन विहीत नमुन्यातील अर्ज घेऊन त्यातील सर्व माहिती अचुक भरुन त्यावर सही करावी.त्या अर्जाला ₹१० चे कोर्ट फी फी स्टॅम्प लावावे.तसेच योग्य त्या किमतीच्या स्टॅम्पवर जातीबाबत सज्ञान अर्जदाराचे स्वयं किंवा वडिल किंवा आई यांचे प्रतिज्ञापत्र करुन त्याची झेरॉक्स काढुन ते प्रतिज्ञापत्र आणि इतर सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडुन हा अर्ज नागरी सुविधा केंद्रात जमा करावा.
अर्जाची छाननी झाल्यानंतर तुम्हाला जातीच्या दाखल्याचे वाटप केले जाईल.हा दाखला मिळाल्यानंतर त्यावर तहसीलदार/नायब तहसीलदार यांचा शिक्का व सही झाल्याची खात्री करुन घ्या
====================

No comments:

Post a Comment