Tuesday, 22 July 2014

शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग....

असे काढा जातीचे आणि नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र

|| मराठा आरक्षण हेल्पलाईन ||
कसा काढणार जातीचा दाखला आणि नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र ?
(साध्या,सरळ शब्दात...)
©लेखन - अनिल माने.
मराठा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम जातीचा दाखला आणि नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र काढावे लागेल.त्यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करा.
====================
STEP -1) जातीचा पुरावा काढणे
१) सर्वप्रथम तुमच्या नावापुढे "मराठा" असा उल्लेख असणारा इयत्ता पहीली ते इयत्ता बारावी पर्यंतच्या कोणत्याही एका वर्गातील तुमचा शाळा सोडल्याचा दाखला काढा.(ओरीजनल किंवा डुप्लीकेट)
जर तुम्हाला असा दाखला मिळाला नाही तर तुम्ही ज्या महाविद्यालयात शिकत असाल तिथुन बोनाफाइड सर्टिफिकेट काढा.परंतु बोनाफाइडवर तुमच्या जन्मतारीख व जातीचा उल्लेख असायला हवा,याची काळजी घ्या.
२) तुमच्या वडिलांचा १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्यापुर्वी जन्म झाला असेल तर त्यांच्या दाखल्यावर "मराठा" अशी जात नमुद असलेला खालीलपैकी कोणत्याही एका पुराव्याची एक मुळ प्रत काढा
अ) पहीली ते बारावी पर्यंतचा शाळा सोडल्याचा दाखला (ओरीजनल किंवा डुप्लीकेट)
ब) जन्म-मृत्यू नोंदीचा महसुल अभिलेखातील उतारा
क) शासकीय-निमशासकीय नोकरीत असल्यास सेवापुस्तकाच्या पहिल्या पृष्ठाचा संबंधित कार्यालयाने जातीची नोंद साक्षांकित केलेला उतारा
ड) समाज कल्याण खात्याकडील जात पडताळणी समितीने वैध ठरविलेले जातीबाबत प्रमाणपत्र.
३) काही कारणाने वडिलांचा जातीचा दाखला उपलब्ध होत नसेल तर तुमच्या घरातील १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्यापुर्वी जन्म झालेल्या तुमचे भाऊ,बहीण,चुलते,आत्या,आजोबा किंवा इतर रक्त नाते संबंधातील व्यक्ती यापैकी कोणीही असेल आणि त्याच्या दाखल्यावर "मराठा" अशी जात नमुद असेल तर त्या व्यक्तीच्या खालीलपैकी कोणत्याही एका पुराव्याची एक मुळ प्रत काढा
अ) पहीली ते बारावी पर्यंतचा शाळा सोडल्याचा दाखला (ओरीजनल किंवा डुप्लीकेट)
ब) जन्म-मृत्यु नोंदीचा महसुल अभिलेखातील उतारा
क) शासकीय-निमशासकीय नोकरीत असल्यास सेवापुस्तकाच्या पहिल्या पानाचा संबंधित कार्यालयाने जातीची नोंद साक्षांकित केलेला उतारा
ड) समाज कल्याण खात्याकडील जात पडताळणी समितीने वैध ठरविलेले जातीबाबत प्रमाणपत्र
४) अशा प्रकारे "मराठा" असा जातीचा स्पष्ट उल्लेख असणारे वरील दाखले घ्या आणि त्यांच्या प्रत्येकी पाच सत्यप्रत (True Copy) तयार करा.
====================
******** सुचना ********
सुचना क्रं. १ - जर १३ ऑक्टोबर १९६७ पुर्वी जन्म झालेल्या तुमच्या वडिल किंवा आजोबांचा जातीचा पुरावा उपलब्ध असेल तर आजोबा-वडिल-तुम्ही अशी तुमचे नाते दर्शवणारी वंशावळ स्टँप पेपरवर लिहुन द्यावी.
सुचना क्रं. २ - वडीलांचा जातीचा पुरावा उपलब्ध नसल्यामुळे इतर रक्त नाते संबंधितांचे पुरावे द्यावे लागत असल्यास तुमचे आणि त्या संबंधित व्यक्तीचे नाते स्पष्ट होण्यासाठी संबंधित व्यक्तीचे आणि तुमचे नाते दर्शवणारी वंशावळ स्टँप पेपरवर लिहुन द्यावी आणि त्याबद्दल काही कागदोपत्री पुरावे असल्यास ते ही द्यावेत.
====================
STEP -2) उत्पन्नाचा आणि रहीवासी दाखला घेणे.
१) आपले रेशनकार्ड घेऊन आपल्या भागातील तलाठी कार्यालयात जा.आपले रेशनकार्ड दाखवुन तलाठ्याकडुन तुमच्या नावाचा (शैक्षणिक कामासाठी असा उल्लेख करुन) मागील एका वर्षाचा आणि मागील तीन वर्षाचा असे उत्पन्नाचे दोन दाखले घ्या.
२) तसेच तलाठ्याकडुन तुमच्या नावाचे दोन रहीवासी दाखले घ्या.
३) वरील प्रमाणे दाखले काढुन घ्या आणि वरील सर्वांच्या प्रत्येकी दोन सत्यप्रत (True Copy) तयार करा.
====================
STEP -3) तहसीलदार कार्यालयातुन जातीचा दाखला काढणे.
१) वर STEP -1 आणि STEP -2 मधे सांगितलेली सर्व कागदपत्रे घेऊन तहसीलदार कार्यालयात जा.
२) ही कागदपत्रे पुढील यादी प्रमाणे एकत्र जोडावीत -
● रेशनकार्डची सत्यप्रत
● रहिवासी दाखला
● जातीच्या पुराव्याच्या सर्व दाखल्यांच्या सत्यप्रती
● १००रु. च्या स्टँप पेपरवर जातीबाबत तुमचे स्वतःचे सत्य प्रतिज्ञापत्र लिहुन द्यावे.त्याच स्टँप पेपरवर वरील सुचना क्रं.१ किंवा सुचना क्रं.२ यापैकी एक लागु होणारी वंशावळ नमुद करावी.तुमचा फोटो लावावा.सही करावी.
३) महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक ०१ सप्टेंबर २०१२ च्या अधिसूचनेतील मुद्दा क्रमांक ३ अन्वये अर्जदार इतर तालुक्यातुन/पर जिल्हातुन/परराज्यातुन स्थलांतरित किंवा महाराष्ट्र राज्यांतर्गत स्थलांतरित झाला असल्यास,अर्जदार ज्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये त्याचे वाडवडिल किंवा नातेवाईक राहत होते,त्या संबंधीत सक्षम प्राधिकाऱ्याकडे जातीच्या प्रमाणपत्राकरिता अर्ज करील.
४) विवाहीत स्त्रियांसाठी प्रमाणपत्र हवे असल्यास पुढील पुरावे जोडावे
अ) विवाहापुर्वीची जात सिध्द करणारा वरील STEP-1 च्या २ व ३ मध्ये दिल्याप्रमाणे कोणताही एक पुरावा
ब) विवाहाचा पुरावा म्हणून विवाह नोंदणी दाखला,राजपत्रात (Gazzette) प्रसिध्द झालेला नावातील बदल व लग्नपत्रिका किंवा पोलीस पाटील यांचा दाखला

५) सेतुमधुन जातीचा दाखला काढण्यासाठी आवश्यक असणारा फॉर्म घ्यावा.त्यातील सर्व माहिती अचुकपणे भरुन तुमची सही करावी.त्यावर १०रु चे एक किंवा ५रु चे दोन कोर्ट फी स्टँप लावावे.या फॉर्मसोबत वर यादीत दिलेली सर्व कागदपत्रे जोडावीत.हा पुर्ण भरलेला व आवश्यक कागदपत्रे जोडलेला फॉर्म सेतु मधे जमा करावा.फॉर्म जमा केल्याची पोचपावती/टोकन घ्यावे.सदर टोकन वर तुमचा जातीचा दाखला मिळण्याची तारीख दिली जाते.हे टोकन जपुन ठेवावे आणि त्यावर दिलेल्या तारखेला येऊन टोकन दाखवुन आपला जातीचा दाखला घ्यावा.त्यावर तहसीलदाराची सही-शिक्का असल्याची खात्री करावी.
जातीचा दाखला मिळाल्यावर त्याच्या दहा सत्यप्रत (True Copy) तयार करा.
े====================
सुचना क्रं.३ - जातीचा दाखला मिळेपर्यंत शालेय कामांसाठी हे टोकन दाखवले तरी चालते.
====================
STEP -4) तहसीलदार कार्यालयातुन उत्पन्नाचा दाखला काढणे.
१) उत्पन्नाबाबतचे पुरावे काढा.
अ) अर्जदार शेतकरी/मजूर असल्यास आपले रेशनकार्ड दाखवुन गाव कामगार तलाठ्याकडुन मागील एक व तीन वर्षांचा उत्पन्नाचा दाखला घ्या.
ब) अर्जदार नोकरदार असल्यास पगाराचे प्रमाणपत्र/आयकर घ्या.
क) अर्जदार व्यावसायिक असल्यास आयकर विवरण पत्र घ्या.
ड) अर्जदाराला वैद्यकीय कारणासाठी प्रमाणपत्र हवे असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र घ्या.
ई) अर्जदार जर पेन्शनर असतील तर बँकेचे पासबुक/बँकेचे प्रमाणपत्र घ्या.
२) हे दाखले व आपले रेशनकार्ड घेऊन तहसीलदार कार्यालयात जा.
३) पुढीलप्रमाणे कागदपत्रांची यादी एकत्र करा.
● रेशनकार्डची सत्यप्रत
● रहिवासी दाखला
● उत्पन्नाबाबतचे पुरावे
● उत्पन्नाबाबत स्टँप पेपरवर सत्य प्रतिज्ञापत्र
अ) अर्जदार सज्ञान असल्यास स्वतःने केलेले प्रतिज्ञापत्र
ब) अर्जदार अज्ञान असल्यास त्याचे आई-वडिल किंवा कुटुंबातील सज्ञान व्यक्तीने केलेले प्रतिज्ञापत्र
४) सेतुमधुन उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आवश्यक असणारा फॉर्म घ्यावा.त्यातील सर्व माहिती अचुकपणे भरुन तुमची सही करावी.त्यावर १०रु चे एक किंवा ५रु चे दोन कोर्ट फी स्टँप लावावे.या फॉर्मसोबत वर यादीत दिलेली सर्व कागदपत्रे जोडावीत.हा पुर्ण भरलेला व आवश्यक कागदपत्रे जोडलेला फॉर्म सेतु मधे जमा करावा.फॉर्म जमा केल्याची पोचपावती/टोकन घ्यावे.सदर टोकन वर तुमचा उत्पन्नाचा दाखला मिळण्याची तारीख दिली जाते.हे टोकन जपुन ठेवावे आणि टोकनवर दिलेल्या दिवशी येऊन टोकन दाखवुन आपला उत्पन्नाचा दाखला घ्यावा.त्यावर तहसीलदाराची सही-शिक्का असल्याची खात्री करावी.
उत्पन्नाचा दाखला मिळाल्यावर त्याच्या दहा सत्यप्रत (True Copy) तयार करा.

====================
STEP -5) तहसीलदार कार्यालयातुन उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेबाबतचे (नॉन क्रिमीलेयर) प्रमाणपत्र काढणे.
१) वरील STEP-3 आणि STEP-4 मधे सांगितल्याप्रमाणे तहसीलदारने दिलेला तुमचा जातीचा आणि उत्पन्नाचा दाखला घेऊन तहसीलदार कार्यालयात जा.

२) पुढीलप्रमाणे कागदपत्रांची यादी एकत्र करा
● रेशनकार्डची सत्यप्रत
● तहसीलदारने दिलेल्या जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
● तहसीलदारने दिलेल्या उत्पन्नाच्या दाखल्याची सत्यप्रत
● उत्पन्नाबाबत स्टँप पेपरवर सत्य प्रतिज्ञापत्र
अ) अर्जदार सज्ञान असल्यास स्वतःने केलेले प्रतिज्ञापत्र
ब) अर्जदार अज्ञान असल्यास त्याचे आई-वडिल किंवा कुटुंबातील सज्ञान
३) सेतुमधुन नॉन-क्रिमीलेयर दाखला काढण्यासाठी आवश्यक असणारा फॉर्म घ्यावा.त्यातील सर्व माहिती अचुकपणे भरुन तुमची सही करावी.त्यावर १०रु चे एक किंवा ५रु चे दोन कोर्ट फी स्टँप लावावे.या फॉर्मसोबत वर यादीत दिलेली सर्व कागदपत्रे जोडावीत.हा पुर्ण भरलेला व आवश्यक कागदपत्रे जोडलेला फॉर्म सेतु मधे जमा करावा.फॉर्म जमा केल्याची पोचपावती/टोकन घ्यावे.सदर टोकन वर तुमचे नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र मिळण्याची तारीख दिली जाते.हे टोकन जपुन ठेवावे आणि टोकनवर दिलेल्या दिवशी येऊन टोकन दाखवुन आपले नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र घ्यावे.त्यावर तहसीलदाराची सही-शिक्का असल्याची खात्री करावी.
नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र मिळाल्यावर त्याच्या दहा सत्यप्रत (True Copy) तयार करा.
====================
सुचना क्रं.४ - ज्यांचे उत्पन्न मागील सलग 3 आर्थिक वर्षामध्ये प्रत्येक वर्षी रुपये 6 लाखांपेक्षा कमी आहे,अशांनाच उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेबाबत (नॉन-क्रिमीलेयर) प्रमाणपत्र मिळेल.
सदर उत्पन्नाची मर्यादा Government Resolution No. 3433/1/2013-Estt.(Res.), Government of India, Ministry of Personnel, Public Grievances & Pensions Department of Personnel & Training, dated 27th May, 2013 अनुसार आहे.
====================
तहसीलदार कार्यालयात सारखे हेलपाटे मारावे लागु नयेत यासाठी पुढील प्रमाणे कृती करा.
● उत्पन्नाच्या आणि जातीच्या दाखल्यासाठी एकाच दिवशी फॉर्म भरा.
● जातीचा दाखला आणायला गेलेल्या दिवशीच नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र काढण्यासाठी फॉर्म भरा.
====================
प्रत्येकाने ही माहीती शेअर करा.
जमले तर पाम्पलेट काढुन वाटा.
जातीचे दाखले व नॉन-क्रिमीलेयर दाखले काढण्यासाठी शिबीर भरवा.
====================
सौजन्य - संभाजी ब्रिगेड बारामती-इंदापुर
====================
|| || || || जयोस्तु मराठा || || || ||

No comments:

Post a Comment